Saturday, September 3, 2016

समाजकल्याण विभागातर्फे विविध पुरस्कारांबाबत आवाहन


सोलापूर दि.03 :- मागासवर्गींयांच्या कल्याणासंदर्भात लक्षणीय व वैशिष्टयपूर्ण काम करणा-या व्यक्ती व संस्थांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, शाहू,फुले, आंबेडकर पारितोषीक, पदमश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार तसेच संत रविदास पुरस्कारांने गौरविण्यात येते.

                         सन 2016-17 या वर्षाकरीता हे पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्काराच्या अटी व शर्तीसाठी इच्छुक समाजसेवक व संस्थांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, तसेच वरील  पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 10 सप्टेंबर 2016 अखेर परिपूर्ण कागदपत्रांसह सादर करावेत, यापूर्वी ज्या व्यक्ती व संस्थांना अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज सादर करु नयेत असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment