सोलापूर दि.03 :- येत्या 5 सप्टेंबर
रोजी गणेश चतुर्थी,
12 सप्टेंबर मुस्लीम बांधवांची बकरी ईद तर 15 सप्टेंबर
रोजी अनंत चतुदर्शी साजरी होणार असून या सणांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्द वगळून
कोणतीही वाद्य, गायन, वाद्यसंगीत साधन,
पात्र ज्यातून प्रतिध्वनी निर्माण होईल असे यंत्र ज्यातून आवाज निर्माण
होतो असा व्यवसाय किंवा कार्यक्रम संबंधित ठाणेदार किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिका-याकडून परवाना घेतल्याशिवाय वाजविता येणार नाही.
हा
आदेश दिनांक 5 ते 15 सप्टेंबर रोजीच्या
रात्री 12 वाजेपर्यंत लागू असेल. मुंबई
पोलीस कायदा 1951 चे
कलम 38 पोटकलम 2 अन्वये आवाजास मनाई करण्याचे,
त्यावर नियंत्रण व विनियमन करण्यासाठी योग्य वाटतील अशा सूचना करण्यासंदर्भांत वरिष्ठ अधिका-यांना अधिकार देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग केल्यास मुंबई पोलीस अधिनियम
1951 चे कलम 136 अन्वये तो शिक्षेस पात्र राहील.
अशी माहिती पोलीस अधिक्षक एस.विरेश प्रभु यांनी
एका पत्रकान्वये दिली आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment