पुणे, दि. 3 : विविध कार्यकारी सहकारी संस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. प्रत्येक शेतकरी या संस्थांचा सभासदझाल्यास त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत शून्य टक्के व्याज दराने शेती कर्ज उपलब्ध होते. याबरोबरच शेतीसाठीलागणारी विविध औजारे,जनावरे व खतांसाठी कर्ज उपलब्ध होऊन शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते. सदर संस्थाच्याकामकाजात व नफयात वाढ होऊन त्याचा फायदा निश्चितच अशा संस्थांच्या सभासदांना म्हणेज शेतकऱ्यांना होतो. जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, पुणे यांच्याकडून जिल्हयातील 100 टक्के पात्र शेतकऱ्यांना संस्थांचे खातेदार करुन घेण्याकरिता जिल्हयातील सर्व तालुकाकार्यालयांना त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व पात्र खातेदारांची माहिती प्राप्त करुन घेऊन संस्थानिहाय नवीन खातेदारांची संख्या निश्चित करणेबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
सदर संस्थाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळते. त्यामुळे खाजगी सावकारांकडू त्यांची होणारीपिळवणूक थांबू शकते. यासाठी तालुका कार्यक्षेत्रातील गरजू व पात्र शेतकऱ्यांना संस्थेकडून पिक कर्ज मिळण्यासाठी संस्थेचे सभासत्वमिळण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत, गट सचिव सभेमध्ये सर्व संस्था सचिवांना मार्गदंर्शन करणेबाबत, सभासदसत्वाचे फॉर्म व त्यासाठीलागणारी सर्व माहिती तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात व संबंधितविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाकार्यालयात उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात सभासद नसणाऱ्या पात्र खातेदारांची संख्या जास्त आहे.अशा संस्थाच्याकार्यक्षेत्रात मेळावे घेऊन जनजागृती करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थ पुरवठा केला जातो. तथापी सदर प्रकिया अतिशय गुंतागुंतीची वक्लिष्ट असून त्यासाठी विविध कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते. त्यामध्ये फार वेळ जातो. विकास संस्थाची कर्ज मंजूरीची प्रक्रियाअतिशय सोपी व सरळ असल्याने तसेच लागणारी कागदपत्रे अतिशय कमी असल्याने या संस्था शेातकऱ्यांना किमान वेळेत व त्वरीत कर्जउपलब्ध करुन देतात. यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या गावातील विविध कार्यकारी सेवासहकारी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
000000
No comments:
Post a Comment