सोलापूर दि.01 : - मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य,सी.विद्यासागर राव हे दिनांक 04 सप्टेंबर 2016 रोजी सोलापूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे -
रविवार दि.04 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 2.00 वा.मुंबई येथून शासकीय विमानाने सोलापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दु.2.05 वा. सोलापूर विमानतळ येथून शासकीय वाहनाने हॉटेल बालाजी सरोवर,सोलापूर कडे प्रयाण. दु.2.10 ते 2.35 वा. हॉटेल बालाजी सरोवर,सोलापूर येथून शासकीय वाहनाने विमानतळ येथे आगमन व राखीव.दु.2.40 ते 2.55.सोलापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दु.2.55 वा.मा.राष्ट्रपती महोदय, भारत गणराज्य, यांच्या स्वागतास उपस्थिती. दु.3.05 वा. मा.राष्ट्रपती महोदय, भारत गणराज्य यांचे समवेत शासकीय वाहनाने इंदिरा गांधी स्टेडियम, सोलापूरकडे प्रयाण. दु.3.15 ते 4.45 वाजेपर्यत मा. राष्ट्रपती महोदय, भारत गणराज्य, यांचे समवेत मा.श्री.सुशिलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभास उपस्थिती. सायं.4.45 वा.मा.राष्ट्रपती महोदय, भारत गणराज्य यांच्या समवेत शासकीय वाहनाने इंदिरा गांधी स्टेडियम, सोलापूर येथून सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. सायं.4.55 वा. मा.राष्ट्रपती महोदय, भारत गणराज्य यांच्या समवेत सोलापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं.5.05 वा. मा.राष्ट्रपती महोदय, भारत गणराज्य यांच्या निरोप समारंभास उपस्थिती व राखीव. सायं. 5.10 वा. सोलापूर विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment