Thursday, September 1, 2016

पुणे शहरात काही भागात नो पार्किंग व एकेरी वाहतूक

  

  पुणे, दि.1: पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी  पुणे शहरातील काही ठिकाणी नो पार्किंग  करण्यात येत आहेपुणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ प्रविण मुंढे यांनी कळविले आहे.
त्यावेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांचे व्यतिरीक्त इतर कोणतेही वाहन चालविण्यास अथवा पार्किंग बंदी करण्यात येत आहे.
कोंढवा वाहतूक विभागांतर्गत, एनआय बी एम उंड्री रोडवरील क्लोव्हर मेट्रोपाल इमारत चे इन आऊट गेट  दरम्यान नो-पार्किग करण्यात येत आहे
सहकारनगर वाहतूक विभाग अंतर्गत, पुणे सातारा रोडवरील पुष्पमंगल चौक ते राव नर्सिग होम पर्यत सर्व्हिस रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किग नो हॉल्टींग करणेत येत आहे.
कोथरुड  वाहतूक विभाग अंतर्गत, पौडरोडवरील संपुर्ण शिवतिर्थनगरमध्ये पी-1,पी-2 नो-पार्किग  करणेत येत आहे.
कोथरुड वाहतूक विभाग पुणे अंतर्गत,.जी..कुलकर्णी पथ हॉटेल क्लब दिल्ली जवळील हॉटेल सबवे लेनमध्ये वाहतुकीत बदल करणेत येत आहेत.
विश्रांतवाडी  वाहतूक विभाग पुणे अंतर्गत, कळस .नं. 124/1/1/1/1 लक्ष्मी टाऊनशिप-1 या सोसायटीचे सीमाभिंतीलगतचा रोड नो-पार्किग  करणेत येत आहे.
भारती विद्यापीठ वाहतूक विभाग पुणे अंतर्गत, बालाजीनगर-धनकवडीरोडवर गुलाबनगर चौक ते शाहुबँक या रोडवर पी-1,पी-2 पार्किग तयार करणेत येत आहे.
सहकारनगर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत,नुतन ट्रेडर्स ते म्हाळसाकांत फोटेा स्टुडिओ पर्यत दुचाकी वाहनांसाठी  पी-1,पी-2 इतर सर्व वाहनांसाठी  नो-पार्किग, नो-हॉल्टींग करणेत येत आहे.
 0000 



No comments:

Post a Comment