सोलापूर दि. 04: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज येथील विमानतळावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. आशिष शेलार आदी मान्यवर होते.
या स्वागत प्रसंगी खासदार शरद बनसोडे, आ. प्रणीती शिंदे, महापौर प्रा. सुशिला आबुटे, विभागीय आयुक्त चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मनपा आयुक्त विजय काळम पाटील, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, माजी आ. नरसिंग मेंगजी, शहाजी पवार, राजेंद्र मिरगणे, प्रा. अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment