Monday, May 4, 2020

पुणे- पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड  महानगरपालिका तसेच प्रतिबंधित 
क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे. पुणे महानगरपालिका,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही कामगार किंवा कर्मचाऱ्याला कामावर जाण्याची किंवा प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.  उर्वरित क्षेत्रातील कामगारांनी सोबत आपले ओळखपत्र बाळगावे,  पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना, उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था (डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट ॲरेंजमेंट) करायला हवी,  असेही जिल्हाधिकारी नवल किशोर  राम यांनी स्पष्ट केले आहे.
--------------------------------------------------------
All industrial units in Pune district (outside the limits of PMC and PCMC and containment zones of rural areas ) should start working immediately . No formal permission and passes required . However, no labour or employees from CONTAINMENT ZONES  will be allowed to travel or work . Industries will have to make DEDICATED TRANSPORT arrangements for travel in PMC and PCMC areas . Employees must carry their iCards .- 
Naval Kishore Ram
District Magistrate and District Collector, Pune

No comments:

Post a Comment