Tuesday, May 5, 2020

खासदार बापट यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घेतली विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट





पुणे दि 5: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट व लोकप्रतिनिधींनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून पुण्यातील परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केली. यावेळी आमदार दिलीप मोहितेमाजी खासदार प्रदीप रावतपेट्रोल- डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष समीर लडकतउपाध्यक्ष सागर रुकारीराजेश पांडे आदी उपस्थित होते.
   
लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूरांना त्यांच्या गावी जाता येत नाही. परराज्याबरोबरच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातीलही मजूर अडकून पडले आहेत. त्यांना विना सायास कसे पाठवता येईलयाबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच पेट्रोलडिझेल मिळण्याबरोबरच कामगारमजूरांना वैद्यकीय प्रमाणपत्र सहज कसे मिळवता येईलयाबाबतही चर्चा केली.

यावर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी कोणत्याही डॉक्टरांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईलअसे सांगितले. पेट्रोल पंप व किराणा दुकानांबाहेरही गर्दी होता कामा नयेतसेच बाहेरील राज्यात जाणाऱ्या कामगारांच्या अनुषंगाने तेथील जिल्हाधिकारी व  पुणे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणे आवश्यक आहेअसे ते  म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणालेकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन  विविध उपाययोजना करत आहे. अत्यावश्यक साधन सामुग्री  खरेदी करताना दुकाने तसेच पेट्रोल पंपाबाहेरही नागरिकांनी गर्दी करु नये. ज्या राज्यात व जिल्ह्यात कामगार परतणार आहेतत्या ठिकाणच्या प्रशासनाशी जिल्हा प्रशासन संपर्क करत असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर याठीकाणाहून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाचा निर्णय झाल्यास रेल्वेची व्यवस्था देखील केली जावू शकेलअसेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनीही या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा केली.  विविध कंपन्या व उद्योगांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कामगारांना कंपनीमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर पोलीसांनी अडवू नयेअशी सूचना प्रदीप रावत यांनी केली. यावेळी समीर लडकतसागर रुकारीराजेश पांडे यांनीही चर्चा केली.

***


No comments:

Post a Comment