Thursday, August 25, 2016

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी अर्ज करावे


 पुणे, दि. 25:- व्ययसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील कार्यकर्ते  व संस्थांचा गौरव करण्यात येतो. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करीत असलेल्या सेवक व संस्थांच्या कार्याला दाद द्यावी, त्यामधून इतर कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी,  जेणेकरुन व्यसनमुक्ती कार्याच्या ऊत्थांनांसाठी कार्यकर्ते पुढे यावेत आणि त्यायोगे पात्र व्यक्ती व संस्था यांच्या व्यसनमुक्ती कार्याची दखल घेवून त्यांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार शासनातर्फे देण्यात येतो. सन 2016 -17 या वर्षासाठी या पुरस्कारासाठी कार्यकर्ते व संस्था यांचेकडून विहित नमुन्यात  31 ऑगस्ट 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाच्या माहितीसाठी व  अधिक तपशिलासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, तिसरा मजला, नवीन जिल्हा परिषद, पुणे (दूरध्वनी क्र. 020-26131774) यांचेशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
                                               0000000
 

No comments:

Post a Comment