सोलापूर दि. 06: - जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु सभागृहात संपन्न झाली.
यावेळी अशासकीय सदस्यांनी विविध विभागाबद्दल लेखी स्वरुपात ज्या तक्रारी अडचणी दिल्या आहेत. त्याचे निराकरण संबंधित विभागाने तारतम्याने निर्णय घेवून करावे, असे निर्देश श्री. भालेदार यांनी दिले.
आज संपन्न् झालेल्या बैठकीमध्ये सोलापूर- पंढरपूर या मार्गासाठी एस.टी.विभागाचे अधिकचे शुल्क, चारित्र्य प्रमाणपत्र, ट्रॅफिक व्यवस्था, पंढरपूरातील अतिक्रमण, त्याचबरोबर रजिस्टर नोंदणीकृत गाळे भाडेपट्टा व पोटभाडेकरु आदी संदर्भातील समस्याबाबत अशासकीय सदस्यांनी सूचना केल्या त्याचबरोबर या समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात यावे, असे सुचविले.
या बैठकीसाठी अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, जि.प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, एस.टी. विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, शशिकांत हरीदास, दिपक इरकल, शोभना सागर, तानाजी घाडगे, प्र.वि.कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
लोकशाही दिनात 41 अर्ज प्राप्त
सोलापूर दि. 06:- जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक 06 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या लोकशाही दिनात 41 अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी करुन संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी दिली.
या लोकशाही दिनात 4 टोकन तसेच मागील एका प्रलंबित अर्जावर सुनावणी घेवून संबंधित कार्यालय प्रमुखाला यावर कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आजअखेरपर्यंत विविध विभागाची सुमारे 179 प्रकरणे प्राप्त झाली असून ही प्रकरणे संबंधित विभागाकडे पाठविण्यात आली असून ही प्रकरणे 7 दिवसाच्या आत निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment