Tuesday, September 6, 2016

राष्ट्रीय जंतनाशक दिवस मोहिमेबाबत


सातारा, दि. 6 (जि.मा.का.): सातारा जिल्हयातील 1 ते 19 वयोगटातील शहरी व ग्रामीण भागातील शाळेत जाणारी व न जाणारी  अशी एकूण 6 लाख 49 हजार 386 मुले असून त्यांना एकूण शाळा 3 हजार 854 व 4 हजार 765 अंगणवाडी असे एकूण 8 हजार 619 संस्थानमधून मुलांना औषधांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने यांनी दिली.
 राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे व पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा उद्देश आहे. सातारा जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 1 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत डॉ.माने यांनी राष्ट्रीय जंतूनाशक मोहिमेबाबत सविस्तर माहिती देवून आरोग्य विभागामार्फत जिल्हयातील सर्व शाळा  व अंगणवाडी  येथे सार्वजनिक  आरोग्य संस्था, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग इ. मार्फत जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे, असेही डॉ.माने यांनी कळविले आहे.
0000



No comments:

Post a Comment