सोलापूर दि.16 :- येत्या 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा (नॉर्थ कोट) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण – अनुत्तीर्ण तसेच त्यापुढील शैक्षणिक अर्हता धारण करणा-या 18 ते 30 वयोगटातील उमेदवारांनी या मेळाव्यास मुळ कागदपत्राच्या छायांकित कागदपत्रासह त्याचबरोबर एम्लॉयमेंट कार्ड व पासपोर्ट आकाराच्या फोटोसोबत मोठया संख्येने उपस्थित रहोव असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगर व मार्गदर्शन केंद्राच्या प्रभारी सहायक संचालकांनी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment