Saturday, September 17, 2016

मानवी हक्क जनजागृती बाबत 23 सप्टेंबर रोजी कार्यशाळा


सोलापूर दि.17 : -  मानवी हक्क जनजागृतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 1 पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबईचे अध्यक्ष मा.न्यायमूर्ती एस.आर.बन्नूरमठ उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यशाळेस आयोगाचे सदस्य एम.ए.सईद आणि भगवंतराव द. मोरे ही उपस्थित राहणार आहे.
          आयोगाच्या दिनांक 20 ते 23 सप्टेंबर या दौ-याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उप जिल्हाधिकारी अजित रेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.एच.मोरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आयोगाच्या दौ-याच्या वेळी संबंधित विभागाने आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी, अशा सूचना निवासी उप जिल्हाधिकारी श्री.रेळेकर यांनी दिल्या.
                                                                          0 0 0 0

No comments:

Post a Comment