Saturday, September 17, 2016

20 सप्टेंबरला प्रशिक्षणार्थी मेळाव्याचे आयोजन


सातारा, दि. 17 (जिमाका) केंद्रशासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान हे 28 ऑगस्ट 2014 पासून महाराष्ट्रातील 53 शहरात लागू करण्यात आले आहे. यामध्ये सातारा शहराचाही समावेश आहे. या अभियानाच्या कौशल्य प्रशिक्षणाव्दारे रोजगार उपलब्धता या उपांगाअंतर्गत प्रशिक्षणार्थी मेळाव्याचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले  असून इच्छूकांनी या मेळाव्यात आपली नोंदणी करुन अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन   नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे.
लाभ घेण्यासाठी- प्रशिक्षणा करीता इच्छुक असलेले लाभार्थी, लाभार्थी हा सातारा नगरपालिका हद्दीतील रहिवासी असावा, लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील अथवा गरीब कुटुंबातील असावा, लाभार्थीचे किमान वय 18 ते 45 वर्ष असावे.
योजनेचा फायदा- योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराची उपलब्धता, स्वयंरोजगाराकरीता राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जाची उपलब्धी. समक्ष नोंदणीची तारीख व वेळ- लाभार्थ्यांनी समक्ष नोंदणी करण्याकरीता दिनांक 20 सप्टेंबर 2016 रोजी विशेष नोंदणी अभियान वेळ- सकाळी 11 वाजता. ठिकाण- नगरपरिषद मंगल कार्यालय, 01, केसकर पेठ, सातारा.
या मेळाव्यास उपस्थित राहणा-या लाभार्थ्यांची नोंदणी सातारा नगरपिरषदेमधील शहर अभियान व्यवस्थापन कक्ष यांचे मार्फत करण्यात येणार आहे, असेही श्री.गोरे यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment