सातारा, दि. 16
(जिमाका) :
18 सप्टेंबर रोजी
सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत सातारा
शहरामध्ये सातारा हिल मॅरेथॉन -2016 स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून स्पर्धा ही
पोलीस परेड ग्राऊंड, शिवाजी सर्कल, शाहू चौक, समर्थ मंदिर, प्रकृती हिल रिसॉर्ट ते
परत त्याचमार्गाने पोलीस परेड ग्राऊंड अशी होणार असून या स्पर्धेमध्ये सुमारे 5000
स्पर्धक भाग घेणार आहेत. त्यांना
प्रोत्साहन देण्याकरीता मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तरी
स्पर्धक व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच वाहतूकीची कोंडी होऊ नये,
अपघात घडू नये अथवा कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होऊन नये यासाठी सातारा शहरातील
अंतर्गत वाहतूक मार्गात व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात येत असल्याची
माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी
दिली.
दैनंदिन वाहतूकीचे बंदी घालण्यात
येणारे मार्ग पुढीलप्रमाणे. पोलीस कवायत मैदान- पारंगे हॉस्पीटल चौक-कालिदास पेट्रोलपंप-शिवाजी
सर्कल - मरिआई कॉम्प्लेक्स- शाहूचौक-गुरुवार बाग-अदालतवाडा- समर्थ मंदिर चौक- बोगदा
मार्गे प्रकृती हिल रिसॉर्ट पर्यंत जाणारे रोडवर रुग्णवाहिका, पोलीस वाहने,
अग्निशामक दलाची वाहने वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद.
वाहतूक मार्गातील बदल पुढीलप्रमाणे.
शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक व गोडोली मार्गे पोवईनाका बाजूकडे येणारी सर्व
वाहने बॉम्बे रेस्टॉरन्ट चौक-वाढे फाटा-भुविकास बँक मार्गे सातारा शहरात ये-जा
करतील. बॉम्बे रेस्टॉरंन्ट चौकातून पोवईनाका बाजूकडे येणारी सर्व वाहने वाढे
फाटा-भुविकास बँकमार्गे सतारा शहरात ये-जा करतील. मुख्य बसस्थानक-राधिका
सिग्नल-तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्गकडे जाणारी सर्व वाहने ही भुविकास
बँक-जुना आर.टी.ओ. चौक-जरंडेश्वर नाका वाढे फाटा मार्गे सातारा शहराच्या बाहेर
जातील. सज्जनगड, ठोसेघर, परळी कडून येणारी-जाणारी सर्व वाहने ही भुविकास बँक-जुना
आर.टी.ओ चौक-जरंडेश्वर नाका-वाढे फाटा शेंद्रे मार्गे ये-जा करतील. कास बाजूकडून
सातारा बाजूकडे येणारी वाहने मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत सातारा बाजूकडे येणार
नाहीत किंवा पर्यायी मार्गाने सातारा शहराकडे येतील.
पार्कींगची व्यवस्था पुढीलप्रमाणे.
हिल मॅरेथॉन स्पर्धेकरीता येणारे स्पर्धकांनी व नागरिकांनी आपली वाहने ही
प्रशासकीय इमारतीच्या समोरील मोकळया मैदानामध्ये लावावी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस
दलास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment