सातारा, दि. 16 (जिमाका): प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन
2016-17 अंतर्गत ठिबक तुषार सिंचन
संच योजना अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली
असुन सातारा उपविभागातील सातारा,
कोरेगाव व खटाव तालुक्यातील ठिबक व तुषार
संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांनी दिनांक
6 ऑक्टोबर 2016 पर्यत ऑनलाईन
अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.
एन. भुजबळ यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावरील ई ठिबक
ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी
ऑनलाईन केलेल्या अर्जाची व
त्यामध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांची
प्रत संबधित तालुका कृषि अधिकारी
कार्यालयात 6 ऑक्टोबरपर्यंत सादर
करावी.
या योजनेचा
लाभ घेण्यासाठी पुढील अटींची
पुर्तता करणारे शेतकरी पात्र असतील:- शेतकऱ्याचे नावे मालकी हक्काची
जमीन असावी. मालकी हक्काचा 7/12 व 8 अ उतारा प्रस्तावासोबत सादर करावा.
शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी.
विद्युत पंपाकरीता कायमस्वरुपी विद्युत जोडणी असवी. त्या पृष्ठर्थ मागील नजीकच्या
काळाची विद्युत बीलाची प्रत प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत,शेडयुल्ड
बँक,सहकारी बॅकेत खाते असल्याचा पुरावा प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यास 5 हेक्टर
क्षेत्राच्या मर्यादेत सुक्ष्म सिंचन योजनेचा
लाभ घेता येईल. यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी
मागील दहा वर्षात
5 हेक्टर किंवा जास्त क्षेत्रासाठी ठिबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाहीत, असेही
श्री.भुजबळ यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment