Saturday, September 17, 2016

सैन्य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन, निवड चाचणी कार्यक्रम


सोलापूर दि.17 : -  दिनांक 6 फेब्रुवारी 2017 पासून सातारा/सोलापूर येथे सुरु होणा-या कोल्हापूर ARO  च्या भरतीसाठी माजी सैनिक महामंडळ (मेस्को) संचलित, मेस्को करीअर ॲकेडमी, करंजे नाका, सातारा येथे दिनांक 03 ऑक्टोंबर 2016 पासून भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीरे चालविली जाणार आहे. यामध्ये मैदानी व लेखी परीक्षेची उत्तम तयारी करुन घेतली  जाईल. सैन्य व पोलीस भरती प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन व शिबीरासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी मेस्को करिअर ॲकेडमीचे प्रतिनिधी बुधवार दि.21 सप्टेंबर 2016 सकाळी     10 ते दुपारी 01 या वेळेत सैनिकी मुलांचे वसतीगृह, विजापूर रोड ITI   च्या पाठीमागे, सोलापूर तसेच दिनांक 21 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत सैनिकी मुलांचे वसतीगृह, रेल्वे स्टेशन जवळ, भक्त निवास शेजारी, पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत. (0217-2302228) व सैनिकी मुलांचे वसतीगृह पंढरपूर (02186-226934) येथे संपर्क करावा.
                           वरील प्रशिक्षण सर्व युवकांसाठी उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी सोलापूर किंवा पंढरपूर येथे  निवड चाचणीच्या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रकासह हजर राहून या योजनेचा लाभ घ्यावा. निवड चाचणीनंतर इच्छुक युवकांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश दिलेल्या युवकांनी प्रवेश शुल्क रक्कम रु.200/- त्वरीत भरुन शिबीरातील आपला प्रवेश निश्चित करावा. उर्वरित मासिक फी रक्कम रु. 6300/- प्रवेशाच्या वेळी भरावी.
                          काही अपरिहार्य कारणामुळे जे उमेदवार निवड चाचणीसाठी कोणत्याही ठिकाणी हजर राहू शकत नाहीत ते मेस्को करिअर ॲकेडमी, सातारा येथे येऊन थेट प्रवेश घेवू शकतात. अधिक माहितीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळात मोबाईल क्र. 9168986864 किंवा 7588624043 वर संपर्क साधावा तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) च्या www.mescoltd.co.in या संकेत स्थळावर भेट द्यावी असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment