Saturday, September 17, 2016

युनिट कोटयातून सैन्य भरती



सातारा, दि. 17 (जिमाका) अर्टिलरी ट्रेनिंग सेंटर, नाशिक रोड कॅम्प, नाशिक येथे युनिट कोटयातून आजी-माजी सैनिक, विधवांची मुले यांच्यासाठी व खेळाडू (राज्य, जिल्हा पातळीवरील क्र.1 व 2) आणि वादय कलाकार यांची दिनांक 3 ते 5 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी दि.3 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 5 वाजता हजर राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर.जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment