सोलापूर दि. 16: - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी),पुणे तर्फे सहायक आयुक्त समाजकल्याण व गट विकास अधिकारी, (पंचायत समिती ) यांच्या सहकार्याने जिल्हयातील 11 तालुक्यात पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत अनुसूचीत जाती व जमाती (अत्याचारास प्रतिबंध ) अधिनियम 1989 या अन्वये तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हयातील दि.21 सप्टेंबर (करमाळा ), दि.22 सप्टेंबर (बार्शी ), दि.23 सप्टेंबर (माढा ), दि.27 सप्टेंबर (माळशिरस ), दि.28 सप्टेंबर (मोहोळ ), दि.29 सप्टेंबर (सांगोला ), दि.30 सप्टेंबर (मंगळवेढा ), दि. 1 ऑक्टोंबर (अक्क्लकोट), दि. 3 ऑक्टोंबर (उत्तर सोलापूर), दि. 4 ऑक्टोंबर (दक्षिण सोलापूर), दि. 5 ऑक्टोंबर (पंढरपूर) याठिकाणी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात तज्ञ मान्यवर व्याख्यान देणार आहेत. इच्छुकांनी या प्रशिक्षणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment