सातारा, दि.
17(जिमाका): सप्टेंबर 2016
मधील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि. 19 सप्टेंबर
2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी
11 वा. आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.
महिला लोकशाही दिनाकरिता
करावयाचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधितांनी दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज, निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहीत नमुन्यातील
अर्ज, आवश्यक त्या कागदपत्रासह महिला लोकशाही दिनाच्या
15 दिवस अगोदर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे पाठविणे
आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱ्या महिला लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व अगोदर जोडलेल्या
कागदपत्रासह उपस्थित राहणे आवश्यक आहे, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment