Wednesday, September 14, 2016

सम विषम पार्कींगबाबत हरकती नोंदवाव्यात



            सातारा, दि. 14 (जिमाका): गुरुवार पेठ सि.स.नं.410  साई चेंबर्स ते संत तेली बाबा मठ ते लाल बहाद्दुर शास्त्री कॉलेज ते मल्हार पेठ सि.स.नं.16 श्री. ठोंबरे घर अखेर जाणा-या रोडवर वाहतूकीची कोंडी होत असल्याने रस्त्यावर सम विषम पार्कींग करण्याबाबत सातारा नगरपरिषद कार्यालयाकडून वाहतूक शाखेकडे पत्र आले असून त्या रोडवर सम विषम पार्कींग करण्याबाबत तेथील स्थानिक रहिवाशांच्या काही हरकती असतील तर त्या लेखी स्वरुपात सात दिवसात वाहतूक नियंत्रण शाखा सातारा येथे सादर कराव्यात, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. घाडगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment