Wednesday, September 14, 2016

डेंग्यू आजाराबाबत नागरिकांनी घाबरु नये


            सातारा, दि. 14 (जिमाका): लोणंद  नगरपंचायतीमध्ये संशयित डेंग्यू व मलेरियाचे रुग्णवाढ खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालावरुन दिसून येत आहे व डेंग्यू, मलेरियाची अंतिम तपासणी सिव्हिल हॉस्पिटल सातारा, जिल्हा हिवताप कार्यालय येथे होत असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने यांनी केले आहे.
            ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथील दवाखान्यात जाऊन उपचार घेवून प्रतिबंधात्मक योजनेची माहिती करुन घेण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंदमार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा व जिल्हा हिवताप अधिकारी सातारा तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती खंडाळा यांच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सूचनेनुसार लोणंद शहरामध्ये जलद ताप सर्व्हेक्षण, रक्तनमुने गोळा करणे, संशयीत डेंग्यू रुग्णाचे रक्तजलनमुने सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे पाठविण्यात आलेले आहेत. तरी नागरिकांनी घरातील खर्चाच्या पाण्याची भांडी आठवडयातून एकदा घासूनपुसून स्वच्छ करुन कोरडा दिवस पाळावा. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. लोणंद नगरपंचायतीमार्फत धूरफवारणी घरात करुन घेण्यात यावी, असेही डॉ.माने यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment