Wednesday, September 14, 2016

सुक्ष्म सिंचन योजनेकरीता 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत


            सातारा, दि. 14 (जिमाका): पंतप्रधान यांच्या मेक इन इंडिया या संकल्पनेस अनुसरुन स्कील इंडिया या नावाने कौशल्य विकास या कार्यक्रमास  केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2022 पर्यंत महाराष्ट्रासाठी 4.5 कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून या योजनेत जिल्हयातील जास्तीत जास्त खाजगी उद्योगांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सहकार्य करावे व कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सुनिल पवार यांनी केले आहे.
            दि.11 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयानुसार शासनाने उद्योगांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उद्योगसमूहांकडे प्रशिक्षणासाठी असलेल्या पायाभूत सुविधा व उपलब्ध प्रशिक्षक यांचा उपयोग कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी करुन घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी उद्योगसमूहांना प्रशिक्षण संस्था म्हणून सूचीबध्दी करण्यावर भर देण्यात आलेला आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही श्री.पवार यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment