Wednesday, September 14, 2016

घरमालकांनी भाडेकरुची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी


            सातारा दि.14(जि.मा.का):घरमालकांनी भाडेकरुंचे नोंदणी संबंधित पोलीस ठाण्याला करणेस व घरमालकांनी भाडेकरुंचे रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य आहे. जेणेकरुन स्वत:ची माहिती लपवून राहणा-या भाडेकरुंवर भविष्यातील सामाजविघात कृती होण्यापासून आळा घालणे आवश्यक आहे, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सातारा जिल्हा स्थलसिमा हद्दीत  शांतता व सुव्यवस्था राखणेसाठी पोलीस अधिक्षक सातारा यांनी त्यांचेकडील दिनांक 3 सप्टेंबर 2016 चे पत्रान्वये निदर्शनास आणून दिले असून त्या अनुषंगाने क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदी लागु करणे आवश्यक झाले आहे.
            उप सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र  शासन यांनी त्यांचेकडील दिनांक 14 जानेवारी 2015 अन्वये फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 (2/1974) च्या कलम 144 (5) अन्वये सदर अधिनियामातील कलम 144 (4)  अन्वये राज्य शासनाने वापरण्याजोगे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात वापरता येतील अशी अधिसूचना निर्गमित केली आहे.
            क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार उपसचिव, गृह विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसुचना क्र.डिआयएस 0314/प्र.क्र.80/वि.शा.1 ब दि. 14 जानेवारी 2015 अन्वये जिल्हादंडाधिकारी अश्विन मुद्गल यांना  प्रदान केलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्हा स्थलसीमा हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखणेकरीता सहा महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजे दिनांक 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत घरमालकांनी आपले घर भाडयाने देत असताना भाडेकरुंकडून फोटो ओळखपत्र व मुळ पत्याचा रहिवासी पुरावा घेतल्याशिवाय घर भाडयाने देवू नये, घरमालकांनी भाडेकरुंची स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी, भाडयाने राहत असलेल्या भाडेकरुंची माहिती फॉर्ममध्ये संबंधीत पोलीस ठाण्याला बिनचुक द्यावी. यासाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.

0000

No comments:

Post a Comment