सातारा, दि.1 (जिमाका): देशाच्या आर्थिक
विकासात एलआयसीचे खूप मोठे योगदान आहे. आज
एलआयसी हिरक महोत्सवी वर्ष पूर्ण करीत आहे. ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज काढले.
एलआयसीच्या वर्धापन दिनानिमित्त
येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांच्या हस्ते
वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी ते शुभेच्छापर
बोलत होते. याप्रसंगी वरिष्ठ मंडल प्रबंधक
तुलसीदास गडपायले, वाणिज्य व्यवस्थापक उत्पल तरफदार, विक्री व्यवस्थापक पवन
बर्नवाल, ग्राहक सेवा प्रबंधक पांडूरंग टोपले, व्यवस्थापक संजय सांगलेकर, अपूर्वा
रानडे, वसंत नलावडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल पुढे
म्हणाले, सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यामध्ये या कार्यालयाने खूप चांगली
प्रगती केली आहे. एलआयसी जागतिक स्तरावरील
आर्थिक संस्था बनली आहे. वीज, रस्ते, धरणे, बंदरे आदी राष्ट्रीयीकरणावेळी
स्वीकारलेली उद्दीष्टे पूर्ण करताना एलआयसीने देशाच्या विकासात मोलाची भूमिका पार
पाडली आहे. याच एलआयसीच्या विकासात आपल्या
सर्वांचे योगदानही नाकारुन चालणार नाही.
एलआयसीच्या वर्धापन दिनानिमित्त
आपणा सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा.
यावेळी एलआयसीमधील अधिकारी,
कर्मचारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
0000
No comments:
Post a Comment