Sunday, September 4, 2016

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्याकडून स्वागत





सोलापूर दि. 04: भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोलापूर येथील विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी  पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपती मुखर्जी यांचे सोलापूर विमानतळावर दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने आगमन झाले.
यावेळी महापौर प्रा. सुशिला आबुटे, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
                                                000

No comments:

Post a Comment