Saturday, August 6, 2016

पशुधन विमा पंधरवडा बाबत आवाहन


सोलापूर दि. 6 : - राज्यातील जनावरांचा विमा उतरविण्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रात 1 ते 15 ऑगस्ट कालावधीत पशुधन विमा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी विमा प्रिमियमचा दर नक्षलग्रस्त जिल्हे वगळून (1 वर्षे 2.45 टक्के), (3 वर्षे 6.40 टक्के), गडचिरोली, गोंदीया व चंद्रपूर या जिल्ह्यात (1 वर्ष 2.90), (3 वर्ष 8.10) टक्के याशिवाय सेवा कराची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी भरावयाची आहे.
                        यासाठी 50 हजार रुपये किंमतीच्या जनावरांचा विमा उतरविण्यासाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 705 रुपये तर अनुसूचित जाती - जमातीच्या तसेच दारिद्र्य रेषेखाली  लाभार्थ्यांसाठी 441 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
                       अधिक माहितीसाठी www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा अथवा पशुसंवर्धन विभागाच्या 18002330418 तसेच 18002091415 या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाचा संबंधितांनी वापर करावा असे आवाहन जिल्हा पधुसंवर्धन उपायुक्त  कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

00000

No comments:

Post a Comment