भारतामध्ये असंसर्गिक
आजाराचे प्रमाण वाढत असून त्यामुळे एकूण मृत्यूपैकी 42 टक्के एवढे मृत्यू होत
आहेत. भारतात सर्वसाधारण कॅन्सर रुग्णांचे प्रमाण 25 लाख एवढे आहे. एन.सी.एम.एच
संस्थेच्या 2005 च्या अहवालानुसार प्रिव्हेलंस रेट- गर्भाशय मुख कर्करोग-21.3 लाख,
स्तन कर्करोग 17.1 लाख, मुख कर्कराग 11.8 लाख आहे. जिल्ह्यात एकंदरीत कर्करोग
रुग्णांचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून तपासणी व उपचारासाठी खासगी रुग्णालयाशिवाय
पर्याय नाही. तथापी संपूर्ण जिल्ह्यात तालुकास्तरावर कर्करोग साक्षर सातारा
अभियानामार्फत मोफत कर्करोग (मुख, स्तन व गर्भाशय मुख) निदान शिबीर घेतल्याने
कर्करोग रुग्ण शोधणे व त्यांना पुढील उपचारासाठी सेवा पुरविणे सोयीचे होणार
आहे. जिल्ह्यात कर्करोग साक्षर सातारा अभियानाची
सुरुवात 26 जुलै 2016 पासून करण्यात आली आहे.
अभियानाची उद्दिष्टे
: जनसामान्यामध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करणे. जिल्ह्यातील कर्करोग (मुख,
स्तन व गर्भाशय) बाधित व इतर रुग्णांना मोफत कर्करोग निदान करुन देण्यात येणार
आहे. निदानासाठी खासगी दवाखान्याचा
अनावश्यक खर्च करावा लागणार नाही. यामुळे
कर्करोगाचे निदान होताच उपचार करणे सोयीच होणार असून जिवीतास धोका उद्भवण्याचे
प्रमाणात घट होणार आहे.
प्रथम टप्प्यात हे
अभियान कराड, पाटण, माण व खटाव या चार
तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. कराड येथे 9 ऑगस्ट, पाटण 10 ऑगस्ट, माण 11 ऑगस्ट
व खटाव येथे 12 ऑगस्ट रोजी कर्करोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान
वर्षभर सुरु राहणार असून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या
मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रामधील कर्करोग
बाधित रुग्णांना शिबीरासाठी तालुकास्तरावर शासकीय वाहनांद्वारे आणण्यात येणार आहे.
शिबीरामध्ये कर्करोग तज्ञ व सहायक कुशल कर्मचारी यांच्याद्वारे शिबीरासाठी तपासणी
करुन निदान करतील.
कर्करोग बांधित रुग्णांना चिकित्सेसाठी येथोचित व खात्रीशिर मार्गदर्शन
करण्यात येवून रुग्णांना ससून हॉस्पीटल,
पुणे, कृष्णा मेडीकल महाविद्यालय, कराड, ऑन्को लाईफ हॉस्पीटल, सातारा येथे उपचारासाठी
पाठपुरावा करण्यात येणार आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात
तालुकास्तरावर निदान शिबीरांचे आयोजन करुन त्याअंतर्गत मुख, स्तन, व गर्भाशय
कर्करोगांचे प्रथमदर्शी मोफत निदान करण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्हा
परिषदेच्या सेस फंडातून 5 लाख अनुदान उपलब्ध झालेले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त
नागरिकांनी लाभ घ्यावा. त्यासाठी रुग्णांना मोफत निदान उपचार झाल्याचे तपशील नमुद
असलेले रुग्ण कार्ड प्राथमिक आरोग्य केद्रामार्फत देण्यात येणार आहे.
कर्करोगाविषयी जनजागृती करणे व योजनेच्या यशस्वीतेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी
या योजनेचा लाभ घ्यावा.
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
00000
No comments:
Post a Comment