Wednesday, August 3, 2016

98 माजी सैनिकांना केंद्रीय सैनिक बोर्डाची मदत मंजूर


            सातारा दि.3 (जि.मा.का.):  जिल्ह्यातील 98 माजी सैनिकांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून चरितार्थ आर्थिक मदत मंजूर झालेली आहे. खात्यावरती रक्कम जमा झाल्यानंतर हयातीचा दाखला केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे माहे डिसेंबरपर्यंत पाठविणे आवश्यक आहे अन्यथा मिळणारी आर्थिक मदत बंद होईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर. आर. जाधव यांनी दिली.
                इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या पाल्यांची प्रकरणे व पदवी अभ्यासक्रम (बीए, बीकॉम, बीएस्सी) ची शैक्षणिक प्रकरणे केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहेत. त्यापैकी काही प्रकरणे रद्द झालेली आहेत.विद्यार्थ्यांनी आपले ई-मेल तपासून पहावे व पुन्हा योग्य त्या दुरुस्त्या करुन ऑनलाईन भरावेत, असेही श्री. जाधव यांनी कळविले आहे.
00 00

                

No comments:

Post a Comment