Thursday, August 4, 2016

आरोग्य तपासणी शिबीर संपन्न


सोलापूर दि. 4 : - जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन अंतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील बालक व कुटुंब यांच्या आहाराबाबत जनजागृती व मातांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने नई जिंदगी येथे महिला बालविकास प्रकल्प कार्यालय, रफिक हॉस्पिटल व मकबुल-ए-आम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मजरेवाडी विभागातील 10 अंगणवाड्या क्षेत्रातील गर्भवती महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
           यावेळी स्त्रियांनी गर्भधारणा कालावधीत घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. रफिक सय्यद यांनी मार्गदर्शन केले.  प्रकल्प अधिकारी संजय माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी    श्री. माने यांनी महिलांनी आहारात पोषक घटकांचा समावेश करावा असे सांगितले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी बोराडे तर आभार प्रदर्शन प्रमिला तुळशे यांनी केले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सेविका व मदतनिस उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment