सोलापूर दि. 2 : - महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य करणाऱ्या महिला व संस्थांच्या सन्मानार्थ केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहेत. संस्थेसाठी रु. 2 लाख व प्रशस्तीपत्र व वैयक्तिक पुरस्कारासाठी रु. 1 लाख व प्रशस्तीपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर पुरस्कार 8 मार्च 2017 या जागतिक महिला दिनी प्रदान करण्यात येणार आहे.
पात्र इच्छुक व्यक्ती / संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव 3 प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 165 अे, रेल्वे लाईन्स, सुरवसे टॉवर्स, 4 था मजला, सोलापूर दूरध्वनी क्रमांक 0217-2310671 या कार्यालयात दिनांक 10 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment