सातारा, दि. 3 (जिमाका) : शालेय
मुलांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रणासाठी जागृती निर्माण करण्यासाठी दिनांक 1
ते 15 ऑगस्ट 2016 या कालावधीत शालेय डेंग्यू जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे,
अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी धर्माशंकर गंबरे यांनी दिली आहे.
डेंग्यूवर कोणताही ठोस उपाय नाही
त्यामुळे डासोत्पत्ती प्रतिबंध हा एक अत्यंत महत्वाचा उपाय आहे. एडिस डासाची उत्पत्ती थांबविण्याकरीता लोकसहभागाची मोठया
प्रमाणावर आवश्यकता असून माहे ऑगस्ट 2016 मध्ये शालेय डेंग्यू जागृती मोहिम
राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये डेंग्यू या आजाराची माहिती जनेतेपर्यंत
प्रभावीपणे पोहचविणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने या महिन्यामध्ये आपल्या
कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये भेट देवून तेथील शिक्षक व
विद्यार्थ्यांना डेंग्यू डासअळी ओळख प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच
डेंग्यू आजाराची प्राथमिक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक माहिती देण्यात येणार आहे.
जिल्हयातील 649 माध्यमिक शाळेतून
डेंग्यूविषयक डास अळीचे प्रात्यक्षिक, डेंग्यूच्या प्रतिज्ञेचं मुलांच्याकडून वाचन
करण्यात येणार आहे. या मोहिमेत शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य
केंद्रे सहभागी होऊन शालेय डेंग्यू जागृती मोहिम प्रभावीपणे राबविणार आहेत, असेही
श्री.गंबरे यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment