Thursday, August 4, 2016

सुरक्षिततेसाठी तारगाव-नांदगाव मार्ग बंद - संभाजी माने


सातारा दि.4 (जिमाका) कोरेगाव तालुक्यातील तारगाव-नांदगाव हा मार्ग धोकादायक पुलामुळे आजपासून बंद करण्यात आल्याने पर्यायी मार्गाचा वापर करा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने यांनी आज केले .
प्रमुख जिल्हा मार्ग ३५ तारगाव-नांदगाव मार्गावरील कृष्णा नदीवरील मोठा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सुरक्षिततेच्या अनुषंगाने आजपासून बंद करण्यात आला आहे त्यामुळे नांदगाव-वेणेगाव कोपर्डे-कालगाव-तारगाव या पर्यायी मार्गाचा अवलंब करावापुलाची लांबी 150 मी. असून 18 मी. चे 8 गाळे आहेत. या पुलाच्या नांदगाव बाजुकडील 3 पीअरची मोठ्या प्रमाणात झीज झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर तज्ञ सल्लागारांकडून पायाची पाण्याखालील तपासणी करण्यात आली तसेच पुलाच्या दुरुस्तीसाठी 100 लक्ष शासनामार्फत मंजूर करण्यात आलेले आहे. या कामाची निविदा निश्चित झालेली आहे. पावसाळा संपताच ऑक्टोबरमध्ये पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
 सध्या सुरु असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन व वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पूल वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment