Thursday, August 4, 2016

प्रलंबित नागरिकत्व व दीर्घ व्हिसा मुदतवाढीसाठी शिबीराचे आयोजन


            पुणे, दि. 4: गृह विभागाचे कार्यासन अधिकारी व व संचालक (स्थलांतर) यांच्या सूचनेनुसार  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुणे येथील पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांचे प्रलंबित नागरिकत्व (Citizenship) तसेच दीर्घ व्हिसा मुदतवाढ (LTV) बाबत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 
      हे शिबीर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मिटींग हॉल, विधान भवन आवार, पुणे  येथे शुक्रवार, 12 ऑगस्ट,2016 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरास श्रीमती प्रविण होरो सिंग, संचालक (immigration) त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहेत.  या शिबीराचा लाभ संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
****

No comments:

Post a Comment