Friday, August 5, 2016

नागरिकांनी दक्षता घ्यावी - पालकमंत्री देशमुख


सोलापूर दि. 5 : -  वागदरी येथील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्याठी प्रशासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनीही दक्षता घ्यावी असे आवाहन पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले.
                गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर वागदरी येथे पालकमंत्री देशमुख यांनी आज भेट दिली  यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते. तत्पूर्वी  पालकमंत्र्यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून रुग्णांची पाहणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत ही साथ आटोक्यात आणण्याबाबत निर्देश दिले.
                ते पुढे म्हणाले की, गावात ज्या ठिकाणी पाणी सोडण्याचे वाल आहेत  ते उंच करुन घ्यावेत तसेच या साथीमध्ये चार नागरिकांचा मृत्यु झाला आहे त्या नागरिकांना मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करु. नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
                याप्रसंगी पालकमंत्र्यांनी मृतांच्या घरी भेट देवून त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच वागदरी गावची त्याचबरोबर पारधी वस्तीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसिलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी श्री. वाघमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जून पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, नगरसेवक शिवानंद पाटील, श्री. बसवराज खेडगी आदी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment