Sunday, April 12, 2020

ससूनची अकरा मजली इमारत सोमवार पासून कार्यान्वित होणार बांधकाम विभागाचीअहोरात्र युद्धपातळीवर कामे सुरू

            पुणे,दि.१२: कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ससून हॉस्पिटल ची नवीन अकरा मजली इमारत सोमवार पासून कार्यान्वित होत आहे.हॉस्पिटलची उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अहोरात्र युद्धपातळीवर झटत आहे.

         


  कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने फ्ल्यू सदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांसाठी या इमारतीमध्ये तळमजल्यावर फ्ल्यू ओपीडी सुरु आहे. तसेच अतिदक्षता विभागात व्हेंन्टीलेटरसह आवश्यक त्या सोयी -सुविधा देण्यात येत आहेत.
फ्ल्यू ओपीडी, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग आदी विभागांच्या कामे पूर्णत्वास आली आहेत.किरकोळ कामे आणि सफसफाईच्या कामांना वेग आला असून कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग आणि त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.



No comments:

Post a Comment