Thursday, May 14, 2020

पुणे विभागातील 1 हजार 697  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 3 हजार 849 रुग्ण
                                              -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर 
      
         पुणे दि. 14 :- पुणे विभागातील 1 हजार 697  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  3 हजार 849 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  1 हजार 949 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 203  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  127  रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 94, सोलापूर जिल्हयात 9, सातारा जिल्हयात 1 तर व कोल्हापूर जिल्हयात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            यापैकी पुणे जिल्हयातील 3  हजार 352  बाधीत रुग्ण असून 1 हजार 533  कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 641 आहे. कोरोनाबाधित एकूण  178  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 116 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
            सातारा जिल्हयातील 124  कोरोना बाधीत रुग्ण असून 39  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोनाबाधित एकूण  2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
            सोलापूर जिल्हयातील 308 कोरोना बाधीत रुग्ण असून 87  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 200 आहे. कोरोनाबाधित एकूण  21  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
            सांगली जिल्हयातील 41  कोरोना बाधीत रुग्ण असून 29  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  11 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
            कोल्हापूर जिल्हयातील 24  कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
            आजपर्यत विभागामध्ये एकुण 40  हजार 438  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 37 हजार  552 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2  हजार 876  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी    33 हजार 654   नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  3  हजार 849   चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील  1 कोटी 2  लाख 20  हजार 936  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 41 लाख 94  हजार 348  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2  हजार  635  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.       
                                                            0          0          0          0          

--

No comments:

Post a Comment