Saturday, May 16, 2020

पुणे विभागातील 2 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 हजार 271 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 16 :- पुणे विभागातील  2 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 271   झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  1 हजार 979 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 217  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 153 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 720   बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 हजार 880  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार  649 आहे. कोरोनाबाधित एकूण 191  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच    142 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
  सातारा जिल्हयातील 126 कोरोना बाधीत रुग्ण असून 45 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.         ॲक्टीव रुग्ण संख्या 79  आहे. कोरोनाबाधित एकूण 2   रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील  353  कोरोना बाधीत रुग्ण असून 112  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 219 आहे. कोरोना बाधित एकूण  22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील 43  कोरोना बाधीत रुग्ण असून  29  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या  14  आहे. कोरोना बाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 28  कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या  18 आहे. कोरोना बाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 45  हजार 593  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 40  हजार  911 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4  हजार 680  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी   36   हजार  583 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4   हजार 271  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 8 लाख 96  हजार 717  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत  4 कोटी 67 लाख 20 हजार 516  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी  2 हजार 900 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
                                 0000

No comments:

Post a Comment