पुणे दि. 17 : - सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 93 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 11 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 160 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 10 हजार 41 स्थलांतरित मजूर असून 61 हजार 179 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment