Sunday, May 17, 2020

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 

        पुणेदि. 17 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहेविभागात अंदाजे  902  क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार  94 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 1  हजार 548  क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 1 हजार 41 क्विंटल इतकी झाली आहेअशी माहिती विभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकर यांनी दिली.

           

            पुणे विभागात 16 मे 2020 रोजी 99.858 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.923 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहेतर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉम्हैसेकर यांनी सांगितले.

 

                                      0  0   0    0

No comments:

Post a Comment