Wednesday, May 13, 2020

फलटण येथील 2 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 98 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


सातारा दि. 13 (जिमाका) :  उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 जणांचे अहवाल निगेटिवह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
98 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतीसिंह नाना पाटील, सातारा येथे 44, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 11, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 20, ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 15 व कोरेगाव येथे 8 असे एकूण 98 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment