बारामती दि. 12 : - यंदा आषाढी वारी निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात आगमन होत आहे.या पालखीचा दिनांक 12 जुलै 2018 रोजी उंडवडी गवळयाची– येथे मुक्काम होणार आहे. त्यानिमित्ताने तेथील पालखी तळांची पाहणी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज केली.
या पाहणी वेळी तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विश्वास ओव्हाळ, सहायक पोलीस निरिक्षक विकास बडवे, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, महावितरण विभाग, नगरपरिषद विभाग, दूरसंचार व विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या पाहणी मध्ये प्रांताधिकारी निकम यांनी पालखी तळांची पाहणी करून संबंधित गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी पालखी मुक्कामाच्या वेळी करावयाच्या सोयी सुविधा, स्वच्छता व घ्यावयाच्या दक्षतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी सविस्तर चर्चा करून वारकऱ्यांना पालखी तळावर प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा बद्दल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी वारक-यांना पुरविण्यात येणा-या गॅस, केरोसीनच्या उपलब्धतेबाबत तसेच वाटपाबाबत सूचना केल्या. पोलीस विभागाच्या अधिका-यांकडून या काळात करण्यात येणा-या वाहतुक नियोजनाचा आढावा घेतला. वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये याकडे सर्व प्रशासकीय विभागांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
00000
No comments:
Post a Comment