पुणे दि. ३ : कौशल्य विकास व उद्योजकता विभाग,
महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय प्रशिक्षण संस्था, पिंपरी चिंचवड, पुणे येथे
२०१८-१९ च्या ऑगस्ट सत्राकरिता प्रवेश सुरू झाले आहेत, तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन
स्वरूपात अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही
औद्योगिक वसाहतीत २.१४ हेक्टरच्या विस्तीर्ण परिसरात वसलेली आहे. संस्थेत २ हजार
६१ चौरस मीटर क्षेत्रफळाची सुसज्ज अशी कार्यशाळा आहे. तसेच ५० मुलांच्या राहण्याची
सोय असलेल्या वसतिगृहाची व्यवस्था आहे. याचसोबत सीएसआर योजनेअंतर्गत व्होक्स वॅगन
कंपनीने संस्थेसोबत दोन कोटी रुपयांचा करार केला असून या निधीतून नूतनीकरणाबरोबरच
अनेक नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संस्थेत अल्पसंख्याक समाजातील उमेदवारकरिता ७० टक्के
जागा राखीव असून खुल्या व मागासवर्ग श्रेणीतील उमेदवारांसाठी ३० टक्के जागा राखीव
आहेत. प्रवेश अर्ज www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
प्रवेशाचे वेळापत्रक, माहितीपुस्तिका इ. माहितीसुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध असून
अधिक माहितीसाठी ०२० – २७६६१२९६ किंवा ०२० – २७६६०३२० या क्रमांकावर संपर्क
साधावा.
No comments:
Post a Comment