‘महारेरा’मुळे बांधकाम व्यवसायात पादर्शकता आली---मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
पुणे,दि.23 :- महारेरा कायद्यामुळे बांधकाम व्यावसायीक व नागरीक निश्चिंत झाले
असून या कायद्यामुळे बांधकाम व्यवसायामध्ये पादर्शकता आली आहे, असे प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आधुनिक महाराष्ट्राच्या
उभारणीत महत्वाचे योगदान असलेल्या बांधकाम व्यावसायीकांच्या कार्यकर्तृत्वाची
यशोगाथा मांडणाऱ्या विश्वकर्मा-द ड्रीम बिल्डर्स ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या
कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज येथे करण्यात
आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खा.संजय काकडे,महापौर मुक्ता टिळक, लोकमत ग्रुपचे
अध्यक्ष विजय दर्डा, क्रेडाई संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश मगर, लोकमतचे संपादक
विजय बाविस्कर, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्राला पुढे
न्यायचे असेल तर, देशाची बांधणी करणे आवश्यक असून त्यासाठी बांधकाम व्यावसायीकांच्या
समस्या दूर करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायीक व शासन
यामध्ये सलोख्याचे संबंध असल्यास त्याचा फायदा सर्वांना होतो. अशाप्रकारच्या
चर्चासत्रातून अडचणींवर चर्चा होऊन त्यावर तोडगा काढता येतो. बांधकाम
व्यावसायीकांच्या प्रकल्पांना त्वरित मंजूरी देण्यात येत असल्यामुळे बांधकाम
व्यावसायीकांवरील बँकेच्या व्याजाचे ओझे कमी होण्यास मदत झाली असून पर्यावरणविषयक
नियमांमुळे बांधकाम प्रकल्प बाधीत होणार नाही याबद्दल कार्य करण्यात येईल.
रेरामध्ये देशातील प्रकल्पांपैकी जवळपास साठ टक्के प्रक्ल्प महाराष्ट्रात आहेत.
बांधकाम व्यावसायीकांना देण्यात येणाऱ्या विविध परवानग्यांचे पीएमआरडीएकडून
सुलभीकरण करण्यात येत आहे.
महारेरा मान्यताप्राप्त प्रकल्पांवर
दुर्घटना घडल्यास त्या अपघात म्हणून हाताळण्याबाबत विचार करण्यात येईल असे यावेळी
मुख्यमंत्री म्हणाले.
वृत्तपत्राला
समाजातील सर्व वर्गांना सोबत घ्यावे लागते, त्यासाठी सर्वांना जे हवे ते द्यावे
लागते. प्रिंट मिडीयातून विविध विषयांना प्रसिध्दी देण्यात येते त्यामुळे ज्ञान
वाढते असे सांगुन, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वाटचालीमध्ये लोकमतचा मोठा वाटा आहे, असेही मुख्यमंत्री
म्हणाले.
पालकमंत्री गिरीश
बापट यांनी सामान्य नागरीक आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका लोकमत वृत्तपत्राने
घेतली असल्याचे सांगितले.
यावेळी, विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत सामाजिक जडणघडणीत महत्वाचे
योगदान दिलेल्या मान्यवरांचा महाराष्ट्र लीडरशीप अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये पद्मभूषण डॉ.के.एच.संचेती,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण
डॉ.शां.ब.मुजुमदार, ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे, ज्येष्ठ तबलावादक
पद्मश्री पंडीत सुरेश तळवलकर,
ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचा
पगडी, शाल व सन्मानपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
00000
No comments:
Post a Comment