Monday, September 12, 2016

अनंत चर्तुदशीनिमित्ताने परिवहन विभागाची अनुज्ञप्ती चाचणी पुढील सात दिवसात


            पुणे,दि.12: अनंत चर्तुदशी निमित्ताने 15 सप्टेंबर,2016 रोजी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदरहू कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिचवड कार्यालयांचे सर्व कामकाज बंद राहील.
            प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिचवड येथे अनुज्ञप्ती चाचणीसाठी ज्या नागरीकांनी पुर्वनियोजीत ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली आहे त्यांनी पुढील कामकाजाच्या सात दिवसात कोणत्याही सोयीस्कर दिनांकास चाचणीसाठी उपस्थित रहावे. त्यादिवशी त्यांचे शिकाऊ अनुज्ञप्ती/पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे कामकाज करण्यात येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000



No comments:

Post a Comment