सोलापूर दि. 12: - राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाचा पुणे नाका येथे बसपोर्ट तयार करण्याबाबत पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, राज्य परिवहन महामंडळ सोलापूरचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी , विभागीय अभियंता श्री. जावडेकर उपस्थित होते.
पुणे नाका येथे राज्य परिवहन महामंडळाचा बसपोर्ट झाल्यास शहरातील वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे. यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही संबंधित विभागाने तातडीने सुरू करावी. पुढील 50 वर्षाचे नियोजन करून अद्यावत बसपोर्ट तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच बसपोर्टसाठी आवश्यक असणारी जमीन संपादनासाठी व अन्य आवश्यक बाबींची कार्यवाही करावी अशा सूचना पालकमंत्री श्री. देशमुख यांनी बैठकीत दिल्या .
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment