सोलापूर दि. 12: - जिल्हाधिकारी कार्यालय व कार्यालयाच्या अधिनस्त शाखांना दूरध्वनी EPABX ( अंतर्गत दूरध्वनी सेवा संविदा ) सेवा सुविधा व देखभाल दुरूस्तीसाठी इच्छुकांकडून दरपत्रकाची मागणी करण्यात आली आहे. संबंधितांनी आपली दरपत्रके 21 सप्टेबर 2016 पर्यंत तहसिलदार सर्वसाधारण , जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दुपारी 3.00 पर्यंत सादर करावीत. दरपत्रके त्याच दिवशी सायंकाळी 5.00 वाजता लेखाधिकारी, तहसिलदार सर्वसाधारण आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समक्ष उघडण्यात येतील. दरपत्रक मंजुर झाल्यापासून सबंधितास या कामाचा 1 वर्षासाठी ठेका देण्यात असल्याचे तहसिलदार सर्वसाधारण, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, वृत्त, लेख, छायाचित्र आदींची माहिती उपलब्ध करून देणे व याद्वारे ते जनतेपर्यंत पोहोचविणे. राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment