सोलापूर दि. 14: सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, स्वयंसहायता गटाचे कार्य या उपक्रमा संदर्भात जिल्ह्यातील ज्या पत्रकारांनी बातम्या, फोटोफिचर्स, लेखमालेसंदर्भात लिखाण केले असल्यास अशा पत्रकाराला राज्य शासनामार्फत राजमाता जिजाऊ स्वावलंबन जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ठ पत्रकार या पुरस्काराने गौरविण्यात येते.
प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून या निकषास पात्र ठरणा-या पत्रकारांनी त्यांचे प्रस्ताव दोन प्रतीत, फोटो, संपूर्ण पत्ता, भ्रमण- दुरध्वनी क्रमांकासह जिल्हा विकास यंत्रणा, प्रकल्प संचालक यांच्या कार्यालयात दिनांक 16 सप्टेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment