Friday, September 9, 2016

नोंदणीकृत भाजीपाला पिकाची नोंदणी बाबत आवाहन


सोलापूर दि. 09: - युरोपियन युनियनमधील देशांना निर्यात करण्यात येणा-या नोंदणीकृत भाजीपाला पिकाची नोंदणी ऑफलाईन पध्दतीने सुरू झाली असून या मध्ये शेतकरी हिरवी मिरची , दुधी भोपळा , गवार , चिक्कु , शेवगा व तोंडली या पिकाची नोंदणी ऑफलाईन पध्दतीने करता येणार आहे.यासाठी लागणारे अर्ज सबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत .  इच्छुकांनी संबंधित ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी एका पत्रकान्वये  केले आहे.

No comments:

Post a Comment