सोलापूर दि. 09: - कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2016-17 मधील कार्यक्रम राबविण्यास मंजूरी मिळाली असून , केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अनुसूचित जाती व जमाती या प्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीनुसार लाभ देण्याबाबत देण्यात आले आहेत.
सन 2016-17 मधील तालुकानिहाय लाभार्थ्यांचे अर्ज सोबतच्या लक्षांकानुसार लकी ड्रॉ पध्दतीने निवडण्यात येणार आहेत. याबाबतचा संपूर्ण तपशील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आहे. इच्छुक शेतक-यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment